खो खो खेळाडूंना सरकारी नोकरी मुंबई,

जाहिरात

पुणे:- (क्रि. प्र.) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती करण्यात आलेल्या 95 पैकी 32 खो-खो खेळाडूंचा समावेश आहे. त्यात 11 क्रीडा अधिकारी (गट ब राजपत्रित) आणि 21 शिपाई (गट ड) पदावर नियुक्त झाले आहेत. क्रीडा विभागाकडून यादी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. या थेट नियुक्तीसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी उमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर पदे निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये लिपिक आणि शिपाई पदावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने यादी जाहिर केली आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. नियुक्त झालेल्या खेळाडुंच्या यादीत अमृती कोकितकर, ऐश्वर्या सावंत, नरेश सावंत, दिपाली सबाने, योगेश मोरे, सुयश गरगटे, प्रियंका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार, अक्षय भांगरे यांची क्रीडा अधिकारी पदासाठी तर शिपाई पदावर सोनाली मोकासे, प्रियंका येळे, श्वेता गवळी, मिनल भोईर, पौर्णिमा सकपाळ, रेश्मा राठोड, प्रियंका भोपी, मि noलिंद कुरपे, सागर पोतदार, जान्हवी पेठे, काजल भोर, किरण शिंदे, ऋतुजा खरे, प्रिती काळे, अविनाश देसाई, विजय शिंदे, निखिल मस्के, सुशांत कलढोणे, फैजान पठाण, संपदा मोरे, मयुरी पवार यांचा समावेश आहे. याआधी सुध्दा आयकर विभागात सुध्दा खोखो खेळाडूंची भरती झाली होती.

यासाठी मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे मुख्य आश्रयदाते मा ना श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री मा. ना. श्री संजय बनसोडे साहेब, राज्य संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडायुक्त मा श्री राजेश भैय्या देशमुख यांचे जाहीर आभार राज्य खो खो संघटनेच्या सर्वच पदाधिकारी व खोखो प्रेमींनी व्यक्त केले आहे.

महाष्ट्र दर्पण

दर्पण महाराष्ट्र न्युज

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *