धाराशिव येथे खो-खो खेळाडूंकडून वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम

जाहिरात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानात ‘एक खेळाडू – एक वृक्ष’ उपक्रम

धाराशिव ता.२३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आश्रयदाते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. खो-खो मैदानावर महिला व पुरुष खेळाडूंनी एकत्र येऊनएक खेळाडू – एक वृक्ष’ उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

या उपक्रमात प्रत्येक खेळाडूकडून एक झाड लावून, त्याचे वर्षभर संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी एकूण ५० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. तसेच लावलेली झाडे केवळ रोपणापुरती मर्यादित न ठेवता, ‘जपलं तर जगेल’ या भावनेतून खेळाडूंनी संगोपनाची प्रतिज्ञा घेतली.

हा उपक्रम महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. त्यांनी सांगितले की, “खेळाडूंमध्ये शिस्त, सामाजिक भान आणि जबाबदारी ही मूल्ये असतात. त्यामुळे ‘खेळ व पर्यावरण’ या संकल्पनेला जोड देत हा उपक्रम घेतला गेला.”

या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर खो खो खेळात चमकणाऱ्या खेळाडू अश्विनी शिंदे व गौरी शिंदे, तसेच राष्ट्रीय खो-खो खेळाडू संपदा मोरे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले, विजय शिंदे, रोहित चव्हाण, अनिकेत पवार यांच्यासह अनेक खेळाडू, प्रशिक्षक व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षसंवर्धन व स्वच्छता राखण्याचा संकल्प करत “स्वस्थ खेळाडू, स्वच्छ निसर्ग, सशक्त महाराष्ट्र” या घोषणेने वातावरण भारावून गेले.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *